|Monday, November 19, 2018
You are here: Home » Automobiles » मारूती सुझुकीची ‘इग्निस’ कार बाजारात

मारूती सुझुकीची ‘इग्निस’ कार बाजारात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

गेल्या वर्षात सगळयात लोकप्रिय ठरलेल्या मारूती सुझुकी कंपनीने आपली ‘इग्निस’ ही नवी कार बाजारात आणली आहे. कंपनीला या कारकडून मोठया अपेक्षा असून कॉम्पॅक्ट क्रॉसओवर मारूती सुझीकी लाईनअपमधील ही तिसरी कार आहे.

या कारमध्ये अनेक नवे आकर्षक फिचर्स देण्यात येणार आहेत. टचस्क्रीन असलेले इन्फोटेन्मेंट सेटअप आणि इनबेल्ट नॅव्हिगेशन स्क्रीन देण्यात आली आहे. या कारमध्ये मॅन्युल आणि ऑटोमॅटीक गिअर बॉकस आहेत. कारचे पेट्रोल मॉडेल 20.89 किमी प्रतिलिटर मायलेज तर डिझल इंजन 26.80 किमी प्रतिलिटरचे मायलेज देणारे आहे, इग्निस ही कार रिटल्स रिप्लेस करेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. कार महिंद्रा केयुव्ही 100 या कारला टक्कर देण्याची शक्यता आहे. यासोबत इग्निस ही कार निळया, पांढऱया आणि काळया रंगात अपलब्ध होणार आहे. लाल रंगासोबत ब्लॅक रूप मिळणार आहे. इग्निसमध्ये युएसबी, ब्ल्यूटूथ यांसारखे अनेक फिचर्सही देण्यात आले आहेत.

Related posts: