|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » साळशीच्या बेपत्ता माजी सरपंचांचा विहीरीत पडून मृत्यू

साळशीच्या बेपत्ता माजी सरपंचांचा विहीरीत पडून मृत्यू 

प्रतिनिधी/ बांबवडे

साळशी (ता. शाहूवाडी) येथील गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या माजी सरपंच नारायण तुकाराम पाटील (वय 76) यांचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजी सरपंच नारायण पाटील हे बुधवार (दि. 11) रोजी रात्री 10 वाजता देवळातील वाचन आटोपून घरी झोपायला गेले असता त्या रात्रीपासून ते बेपत्ता झाले होते. त्यांना विसरभोळेपणाचा त्रास होता. त्याच्यावर औषधोपचारही सुरू होते. बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांचे पुतणे लक्ष्मण मारुती पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. आज सकाळी नारायण पाटील यांचा मृतदेह साळशी गावाच्या अंबिरा ओढय़ाच्या काठावरील नाग नावाच्या शेतातील जयवंत दादासो पाटील यांच्या सामाईक विहीरीत तरंगताना आढळून आला.

घटनेची वर्दी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. विसरभोळेपणामुळे विहीरीत पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपास हवालदार सर्जेराव पाटील, विश्वास चिले, एस. डी. अपराध, आर. आर. पाटील करीत आहेत.

Related posts: