|Friday, November 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » अभिनेत्री अश्विनी भावेचा मांजा

अभिनेत्री अश्विनी भावेचा मांजा 

अश्विनी भावे हिच्या ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला. मांजा या वेगळय़ा आणि आधी कधीही न पाहिलेला विषय असलेल्या चित्रपटाच्या टिझर पोस्टरनंतर अश्विनीच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मकर संक्रांतीचे औचित्य साधून या चित्रपटाच्या टिझर पोस्टर सोबतच प्रदर्शनाची तारीख देखील घोषित केली आहे. हा सिनेमा 21 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन जतिन वागळे यांनी केली आहे. इंडिया स्टोरीज निर्मित ‘मांजा’ चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसफष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावे सोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुद्गलकर देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत.

Related posts: