|Saturday, January 19, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशकडे 122 धावांची आघाडी

बांगलादेशकडे 122 धावांची आघाडी 

वृत्तसंस्था/ वेलिग्ंटन

येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत बांगलादेशला 122 धावांची आघाडी मिळाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने 18.3 षटकांत 3 बाद 66 धावा केल्या होत्या. मोमीनल हक 10 धावांवर खेळत होता. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा पहिला डाव 539 धावांवर संपुष्टात आला.

प्रारंभी, किवीज संघाने 3 बाद 292 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. टॉम लॅथमने 177 धावांची खेळी साकारली. बीजे वॅटलिंग (48) व मिचेल सँटेनर (73) यांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला पाचशेपर्यंत मजल मारुन दिली. तळाचे फलंदाज मात्र झटपट बाद झाल्याने किवीज संघाचा पहिला डाव 539 धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशला अवघ्या 56 धावांची आघाडी मिळाली. कमरुल रब्बीने 3, मेहमुदुल्लाह व शकीबने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दुसऱया डावात खेळताना बांगलादेशची खराब सुरुवात झाली. सलामीवीर तमीम इक्बाल 25 धावा काढून बाद झाला. इमरुल कयासही 24 धावांवर रिटायर्ड झाला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने 18.3 षटकांत 3 बाद 66 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे आता 122 धावांची आघाडी असून सामन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 595/8 घोषित व दु.डाव 18.3 षटकांत 3 बाद 66 (तमीम इक्बाल 25, मोमीनल हक खेळत आहे 10, नील वॅगनर 1.14), दक्षिण आफ्रिका प.डाव 148.2 षटकांत सर्वबाद 539

Related posts: