|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिला साहित्य संमेलनासाठी नाटय़वाचन स्पर्धा

महिला साहित्य संमेलनासाठी नाटय़वाचन स्पर्धा 

प्रतिनिधी/ बेळगाव

‘मंथन’ कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्यावतीने 29 जानेवारी रोजी होणाऱया महिला साहित्य संमेलनासाठी रविवारी हिंदवाडी येथील डॉ. मंदाकिनी ईश्वर पट्टण सभागृहात मंथन नाटय़वाचन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेमध्ये कथा, एकांकिका व नाटय़ प्रवेश याची निवड, वाचनाअंतर्गत भावप्रदर्शन व श्रोत्यांवरील त्याचा प्रभाव या तीन मुद्यांवर परीक्षण करण्यात आले.

मामा गवेकर, द. मा. मिरासदार वि. वा. शिरवाडकर, प. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यांच्या सरस, मार्मिक व तितक्याच वैचारिक कथांचे अप्रतिम वाचन करण्यात आले. मेधा मराठे, आसावरी भोकडे यांनी परीक्षणाची जबाबदारी हाताळली.

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रिया कवठेकर, द्वितीय राही कुलकर्णी, तृतीय संजीवनी खंडागळे, उत्तेजनार्थ क्रमांक आरती आपटे यांना मिळाला.

उपस्थितांचे स्वागत निर्मला कळ्ळीमनी यांनी केले. सूत्रसंचालन विद्या हंगिरगेकर यांनी केले. यावेळी प्रा. वर्षा कुलकर्णी, शोभा लोकुर, अपर्णा देशपांडे, शितल बडमंजी, प्र. भा. बोकिल, स्वाती काजरेकर, लता हुलबत्ते व रसिक उपस्थित होते.

Related posts: