|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शब्दांतरीच्या दृकश्राव्य प्रयोगात रसिक तृप्त रसिक रंजनचा कार्यक्रम

शब्दांतरीच्या दृकश्राव्य प्रयोगात रसिक तृप्त रसिक रंजनचा कार्यक्रम 

प्रतिनिधी/ बेळगाव

घरोघरी एकत्र आल्यावर साऱयांच्या आवडीचा बिनभांडवली खेळ अंताक्षरी नक्कीच खेळला जातो. माणूस कितीही अरसिक राहिला तरी अंताक्षरी खेळताना त्याच्यातील रसिकता बाहेर पडतेच. नेमकी हीच कळ ओळखून ज्या शब्दाने एकगीत संपते त्याच शब्दाने दुसरे गीत सुरु करीत रसिकांना खिळवून ठेवणारा शब्दांतरीचा कार्यक्रम रविवारी रंगला होता.

लोकमान्य रंगमंदिरात रसिकरंजनतर्फे आयोजित या कार्यक्रमाने रसिकांना तृप्त केले. या कार्यक्रमाच्या संयोजिका होत्या भारती कित्तूर. प्रारंभी रसिकांच्यावतीने कर सल्लागार मधुसूदन चौधरी दांपत्याच्यावतीने भेट वस्तु देवून त्यांचा सन्मान झाला. चौधरी दांपत्याला याच कार्यक्रमाची सीडी भेट स्वरुपात देण्यात आली. प्रास्ताविकात अनिल चौधरी यांनी रसिक रंजन सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण 70 कार्यक्रमांचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती देतानाच भारती कित्तूर यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले.

हम पे आया न गया, तुम पे बुलाया न गया या गीताने सुरुवात करीत त्यानंतर लगेच गया अंधेरा हुवा उजाला चमका चमका सुभा का तारा हे गीत सादर झाले. तारोंकी आखोंका तारा तूम, तु कहे अगर, अगर सुनले तो एक नगमा हुजेरे यार लाया हूं, आजारे अब मेरा दिल पुकारा, आजारे मेरे प्यार के राही, राही मतवाले, मतवाला जीया, जीया ओ जीया कुच्छ बोल दो आदी गितांनी रसिकांना खिळवून ठेवले होते.

रात्र ने क्मया क्मया खॉब दिखाये, दिखायी दिये यु की बेखुद किया, यु तो हमने लाख हसी देखे है, देखा है तेरी आखोमे प्यार ही प्यार बेशुमार, आखोंही आखो मे इशारा हो गया आदी गिते सादर झाली. प्रत्येक गीतात प्यार आणि आखे हे दोन शब्द तर हमखास होते. जुन्या काळात रंगून जात रसिक या कार्यक्रमाला दाद देवून गेले.

Related posts: