|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार

आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आलीकडे ‘सैराट’च्या कन्नड  रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.‘मनसू मल्लिगे’ हा ‘सैराट’चा कन्नड रिमेक आहे. या चित्रपटाचे शूटिंग बंगळुरू, होस्पेट, गदग, कोल्लेगला, चामराजनगर येथे पार पडले. गेले 30 दिवस हे शूट सुरू होते. ‘सैराट’ चित्रपट कन्नड, तमीळ, तेलेगु आणि मल्याळम या भाषांत बनणार आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धमाल करणार हे योणरा काळच सांगेल.

Related posts: