|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भालचंद्र बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

भालचंद्र बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी 

कणकवली : प. पू. भालचंद्र महाराज यांच्या 113 व्या जन्मोत्सव सोहळय़ाच्या निमित्ताने प. पू. भालचंद्र महाराज आश्रमात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला. भालचंद्र महाराजांच्या या 113 व्या जन्मोत्सव सोहळय़ानिमित्त पहाटेपासून काकड आरती, समाधी पूजन, अभिषेक, भालचंद्र गायत्री मन्युसुक्त विधान याग, सत्यनारायण पूजा, भजने, गोमंतक संत मंडळ संचलित कीर्तन विद्यालय, फोंडा-गोवा येथील बालयुवा कीर्तनकारांचे आध्यात्मिक, संस्कारभक्ती, नामस्मरण, देशप्रेम या विषयावर चक्री कीर्तन झाले. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 17 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच सकाळी 9 वाजता 113 रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर होणार आहे. दुपारी 4 वाजता संगीतकार श्रीधर फडके, मुंबई यांचा भक्तिगीत व भावगीतांचा गीत रामायण हा कार्यक्रम होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन आश्रम संस्थेचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

 

 

Related posts: