|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोण येथे भाजपाची जाहीर सभा संपन्न

काणकोण येथे भाजपाची जाहीर सभा संपन्न 

       भाजपाची पक्षशिस्त अंत्यत महत्वाची

काणकोण  / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षात पक्ष शिस्त ही अत्यंत महत्वाची असून 2012 च्या निवडणुकीत विजय पै खोत याना पक्षाने उमेदवारी नाकारली मात्र त्यानी पक्ष शिस्त महत्वाची मानून पक्षाचा त्याग न करता पक्षासाठी काम केले. पक्षाध्यक्ष विनय तेंडुलकर 2017 च्या निवडणुकीत सावर्डे मतदार संघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु त्यानीही पक्षाचे कार्य महत्वाचे मानले. क्रीडा मंत्री असलेले रमेश तवडकर हे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून सद्या जी चूक करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत ती चूक त्यानी करू नये असा सल्ला सरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यानी भाजपाच्या शेळेर काणकोण येथील श्री. विजय पै खोत यांच्या निवास स्थानी आयोजित केलेल्या  भाजपाच्या जाहीर सभेच्या वेळी बोलताना दिला. क्रीडा मंत्री असलेल्या रमेश तवडकर यानी काणकोण मतदार संघातील उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला हे आपल्याला उशीरा समजले. ही चूक त्यानी करायला नको होती  हे सांगताना देशाचे सरंक्षण मंत्रीपद सांभाळणाऱया श्री. पर्रीकर यांचे पाणावलेले डोळे काही जणांनी पाहिले.

श्री. विजय पै खोत याना काणकोण मतदार संघातून भाजपाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला असून अवघ्या वेळेत बोलाविलेल्या जाहीर सभेला तीन हजार पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती. त्यात काणकोण पालिकेचे नगरसेवक, काणकोण मतदार संघातील विविध पंचायतीचे आजी माजी सरपंच, महिला मंडळ आणि स्वयंसेवक गटाच्या प्रतिनिधी मोठया संख्यने उपस्थित होत्या. या जाहीर सभेच्या व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, द.गोव्याचे खासदार ऍड नरेंद्र सावईकर, पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, दक्षिण गोवा भाजपाचे अध्यक्ष सर्वानंद भगत, काणकोणच्या नगराध्यक्षा प्रार्थना ना. गावकर, उपनगराध्यक्षा समीता धुरी, युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज ना. गावकर आणि भाजपाचे उमेवादर विजय पै खोत उपस्थित होते.

     यावेळी बोलताना सरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यानी म.गो. पक्ष आणि काँगेंसचा खरपूस समाचार घेतला. भाजपाकडे पूर्ण बहुमत असताना मंत्री मंडळात म.गो पक्षाला महत्वाची खाती दिली. मात्र या पक्षाच्या मंत्र्यानी गोव्याच्या विकासापेक्षा स्वाताचेच भले केले आणि त्यावेळी कमावलेल्या पैशातून ते निवडणुका लढवित असल्याचा आरोप श्री. पर्रीकर यानी केला. सत्तेत आल्यानंतर आर्थिक संकट असताना देखील अनेक योजना सर्वसामान्यासांठी राबविल्या. सद्याचा गोव्याचा  विकास केवळ भाजपाच्या राजवटीतच झालेला असून आपल्याला गोमंतकीयानी जी शक्ती दिली त्या बळावरच आपण केंद्रात काम करीत असल्याचे सांगतानाच नव्या आणि जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्य़ांनी अपासातील मतभेद बाजूला सारून संघटितपणे काम करण्याचा सल्ला त्यानी दिला.

        आपण कधीही सूडाचे राजकारण केले नाही. पक्षशिस्त महत्वाची मानली. मनेंहर पर्रीकर याना नेता मानले. आपला विजय हा निश्चित असून काणकोण मतदार संघात दहा हजार पेक्षा अधिक बेकार युवक असून या मतदार संघात प्रदूषण विरहित फॅक्टरी सुरू करण्याची गरज श्री. पै खोत यानी व्यक्त केले. यावेळी प्रदेषाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे, सर्वानंद भगत , प्रार्थना ना. गावकर यानी विजय पै खोत यांच्या वागणुकीचा आणि पक्क शिस्त सांभाळण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.  बैठकीचे संचालन उमेश नाइं&क यानी केले. तर नारायण गावकर यानी आभार मानले.