|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » …तर गोवा प्रांत कधीच विलीन झाला असता

…तर गोवा प्रांत कधीच विलीन झाला असता 

प्रतिनिधी/ मडगांव

1963 साली जनमत कौल गोवेकरांनी जिंकला नसता तर छोटेसा गोवा प्रांत  कधीच महाराष्ट्रात विलीन झाला असता आणि आज आम्ही महाराष्ट्रीयन झालो असतो असे जनमत कौलाच्यावेळी आघाडीची भुमिका घेतलेले उदय भेंब्रे त्यानी सांगितले.

 ‘जनमत कौला’ला काल 16 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त कोंकणी भाषा मंडळाने मडगावात ‘अस्मिताय दिस’ आयोजीत केला होता. त्यावेळी बोलताना श्री. भेंब्रे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर कोंकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य, पत्रकार संदेश प्रभूदेसाई व सेराफीन कोत, अनंत अग्नी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 ‘जनमत कौल’ जिंकलो नसतो तर गोवेकर आज महाराष्ट्रीयन झाले असते. गोवा मुक्त झाला तेव्हा बरेच लोक अशिक्षीत होते. निर्णय घ्यायला त्यांना दुसऱयांची मदत लागत होती. स्वतःच्या निर्णयासाठी दुसऱयांवर अवलंबून राहात होते. दुसऱयांवर अवलंबून राहण्याची संवय पूर्णपणे गेली पाहिजे व गोवेकर सर्वार्थ्याने स्वावलंबी झाला पाहिजे, ते म्हणाले.

 1963 सालातील आठवण काढून ते म्हणाले, कोंकणी बोलले म्हणून यांच जागेवर दगड मारण्यात आले. काय चुकीचे आणि काय बरोबर हेच त्यांना समजत नव्हते. उल्हास बुयावांची त्यांनी यावेळी यावेळी आठवण केली. आज गोवेकरांनी  कोणावरही अवलंबून राहता कामा नये. सरकार जनमत कौल दिवस साजरा करणार नाही. या परिस्थितीत आपल्यालाच हा दिवस दरवर्षी साजरा करायचा आहे. या निवडणुकीत गोवकरांनी पूर्ण विचारांती मत देऊन गोव्याचे हित जपणाऱयांनाच निवडून आणावे असे श्री. भेंब्रे यांनी आवाहन केले.

 जनमत कौलाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चेतन आचार्य यानी सर्वांचे अभिनंदन केले आणि 18 जून ज्या पद्धतीने साजरा करतात त्याच धर्तीवर हा दिवस साजरा करायला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी केली.

 सेराफीन कोत यांनी आपल्या भाषणात गोव्याची काळजी कशी घ्यावी, संस्कृती कशी साभांळावी ते सांगितले आणि गोवा राज्य सर्वांना खुले असल्यामुळे देश विदेशातील येथे स्थायिक झालेली लोक आपल्या मायदेशात जाऊन गोव्याचे गुणगान गातात आणि म्हणून गोव्याच्या संस्कृतीचे रक्षण करणे आवश्यक आहे.  कोंकणी भाषेचा आदर करावा असे त्यांनी आवाहन केले.

 संदेश प्रभूदेसाई यांनी आपल्या भाषणात आपण 7 वर्षाचा होतो तेव्हा आपल्याला जनमत कौलासंबंधी काहीही समजत नव्हते. मात्र, घरात होणाऱया चर्चा  अजून आठवतात आणि याच अस्मिताय दिवसासाठी हातभार लावतो म्हणून आज आपण खूप आनंदीत आहे. आमच्या याच स्वावलंबामुळे आज कोंकणी चित्रपटाला अंतराष्ट्रीय बक्षीस प्राप्त झाले. जनमत कौलाच्या दिवसाचा आपल्याला विसर पडता कामा नये, त्यांनी सांगितले.

 सुरवातीला, रविंद्र केळेकर दयानंद मंदिराच्या विद्यार्थ्यानी पथनाटय़ सादर केले.  गोव्याची वेगवेगळी संस्कृती गायब होत चाललेली असल्याचे त्यातून दाखवून दिले. अनंत अग्नी यांनी सर्वाचे स्वागत केले.

Related posts: