|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » पंजाबमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा

पंजाबमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा 

ऑनलाईन टीम / पंजाब :

पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी जय्यत तयारी करणाऱया भाजपमध्ये आता अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पंजाबमधील भाजप खासदार विजय सांपला यांनी प्रदेशाध्यक्षपदीचा राजीनामा दिला असून भाजपाध्यक्ष अमित शहा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंजाब निवडणूक भाजपमधील कलहामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वप्रथम नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष वाजय सांपला हेदेखील नाराज असल्याचे वृत आहे. सोमवारी भाजपने निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये फगवाडमध्ये सोमप्रकाश यांना उमेदवारी दिल्याने सांपला यांनी सोमप्रकाश यांच्या उमेदवारील विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतरही सोमप्रकाश यांना उमेदवारी दिल्याने सांपला नाराज आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. आता अमित शहा राजीनामा मंजूर करतात की सांपला यांची नाराजी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.