|Thursday, July 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘या’ तंत्रज्ञानामुळे कळणार कारचे खरे चालक कोण?

‘या’ तंत्रज्ञानामुळे कळणार कारचे खरे चालक कोण? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

डेल्टा आयडी कंपनीने गाडी चोरी रोखण्यासाठी तसेच खरा चालक ओळखणे आता सोपे होणार आहे. कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये हे तंत्रज्ञान सादर केले गेले असून हे तंत्रज्ञान जेन टेक्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ऑटो क्षेत्रात आणले गेले आहे.

हे तंत्रज्ञान गाडीच्या रियर ह्यू मिररबरोबर वापरले जाते. या तंत्रज्ञानानुसार गाडीत बसलेल्या रिअर ह्यू मिररमध्ये पाहिले की त्याच्या डोळयांचे म्हाणजे बुबळाचे स्कॅनिंग केले जाते त्यामुळे जो खरा चालक आहे, त्याचे स्कॅनिग मॅच केले जाते. यामुळे गाडीचा खरा चालकच गाडी सुरू करू शकतो पार्यायाने गाडी चोरी अथवा अन्य चालकाला कार सुरू करणे शक्य होत नाही. कॅब सेवेसाठी हे तंत्रज्ञाान विशेष महत्त्वाचे आहे. कारण यामुळे चालकाची ओळख पटत असल्याने कारमध्ये कोणतेही गैरकृत्य करणे चालकाला महागात पडू शकणार आहे.