|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » भांडवली बाजारात चढ-उतार कायम

भांडवली बाजारात चढ-उतार कायम 

बीएसईचा सेन्सेक्स 52, एनएसईचा निफ्टी 15 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारी घरगुती बाजारात विक्रीचे वर्चस्व दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.25 टक्क्यांनी घसरत बंद झाले. कमजोरी आल्याने निफ्टी 8,400 च्या खाली घसरला. सेन्सेक्समध्ये 50 अंशाची कमजोरी आली. भांडवली बाजाराने दिवसाची सुरुवात चांगली केली होती, मात्र उच्चांकावर पोहोचल्यावर दबाव दिसून आला. निफ्टी 8,440 आणि सेन्सेक्स 27,380 पर्यंत पोहोचला होता.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 52 अंशाने घसरत 27,235 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 15 अंशाने घसरत 8,398 वर बंद झाला.

मिडकॅप समभागात मंगळवारी सुस्ती दिसून आली. स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारत बंद झाला. मेटल आणि ऑईल ऍन्ड गॅस समभागात विक्री झाल्याने बाजारात दबाव दिसून आला. निफ्टीचा मेटल निर्देशांक 1.5 टक्के आणि बीएसईच ऑईल ऍन्ड गॅस निर्देशांकात 1.4 टक्क्यांनी घसरण आली. बँक निफ्टी 0.15 टक्क्यांनी घसरत 19,067 वर बंद झाला. ऑटो समभागात काही प्रमाणात दबाव दिसून आला.

एफएमसीजी, आयटी आणि पॉवर समभागात चांगली खरेदी झाली. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 1.2 टक्के आणि आयटी निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा पॉवर निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

रिलायन्स इन्डस्ट्रीज, कोल इंडिया, अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, ग्रासिम आणि एचडीएफसी 3.3-1 टक्क्यांनी कमजोर होत बंद झाले. एनटीपीसी, एशियन पेन्ट्स, ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनि आणि हीरो मोटो 3.1-1.3 टक्क्यांनी मजबूत झाले.

मिडकॅप समभागात एनएलसी इंडिया, ईमामी, हॅवेल्स इंडिया, एबीबी इंडिया आणि जिंदाल स्टील 3-1.9 टक्क्यांनी घसरले. मिडकॅप समभागात यूपीएल, एम ऍन्ड एम फायनान्सियल, रिलायन्स कॅपिटल, कॅनरा बँक आणि युनायटेड ब्रेव्हरीज 4.3-2 टक्क्यांनी वधारले.

स्मॉलकॅप समभागात डाटामॅट्रिक्स, आयएफबी एग्रो, मास्टेक, जेबीएफ इन्डस्ट्रीज आणि फ्युचर लाईफ 11.4-8.7 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात पोद्दार हाऊसिंग, हर्क्यूल्स, ट्री हाऊस, दीपक फर्टीलायजर्स आणि कॅपिटल ट्रेड 5.3-4.3 टक्क्यांनी घसरत बंद झाले.