|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » निष्णप लघुप्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार जलसंपदामंत्री राम शिंदे

निष्णप लघुप्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार जलसंपदामंत्री राम शिंदे 

प्रतिनिधी/ गारगोटी

भुदरगड तालुक्यातील निष्णप लघुप्रकल्पाचे संकल्पचित्र तत्काळ मागवुन घेऊन प्रकल्प सुरू करण्याकरता लवकरच सुरवात करणार आहोत, असे आश्वासन जलसंपदामंत्री राम शिंदे यांनी निष्णप धरणग्रस्त कृतीसमितीला दिले.

आमदार प्रकाश आबीटकर यांच्या प्रयत्नातुन मुंबई मंत्रालयात निष्णप धरणग्रस्तांची बैठक झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

निष्णप लघुप्रकल्पाला 1999 ला मंजुरी मिळाली आहे. त्यावेळी प्रकल्पासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांची मान्यता मिळाली होती. 2004 पर्यंत या प्रकल्पाचे काम आश्विनी कंन्स्ट्रक्शन या कंपनीने पुर्ण केले. प्रत्यक्षात प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतुन पाण्याचा पाझर वाढल्याने प्रकल्पास धोका निर्माण झाला. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाण्याचा पाझर होणाऱया भागाची दुरुस्ती करण्यास सुरुवात  झाली आहे. जलसंधारण विभागाने पुन्हा भुगर्भ चाचणी करून संकल्पचित्र नाशिक विभागाचे मुख्य अभियंत्यांकडे सादर केले. निष्णप प्रकल्प पुर्ण होण्यासाठी निष्णप, करडवाडी, पारदेवाडी या परिसरातील शेतकऱयांची सातत्याने मागणी आहे. या धरणाच्या कामाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ धरणग्रस्त कृतीसमिती व नागरीकांनी गारगोटी कडगाव मार्गावर दोन तास रास्ता रोको केला.

धरणग्रस्त कृतीसमिती समवेत काम पुर्ण होईपर्यंत आपण शासनाविरोधात संघर्ष करणार असल्याचे आमदार आबीटकर यांनी सांगितले होते. यानुसार तातडीने मुंबईत या संदर्भात बैठक बोलवली. यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मुख्य अभियंता बेंदे यांच्याशी संपर्क साधुन प्रत्यक्ष अहवालासह आठ दिवसात संकल्पचित्र सादर करावे असा आदेश दिला.

यावेळी धरणग्रस्त कृतीसमितीचे अध्यक्ष दगडु राऊळ, विलासराव बेलेकर, दगडु पाटील, जोतिराम निकाडे, रमेश राऊळ, विलास बेलेकर, शंकर राऊळ, संभाजी निकाडे, संदिप राऊळ, राजाराम कांबळे, पांडुरंग निकाडे, दत्तात्रय पाटील, मधु निकाडे, मारूती कांबळे, आनंदा राऊळ, उत्तम राऊळ, बाजीराव निकाडे, मधुकर पाटील, बाबुराव पाटील, बाबु राऊळ, यांच्यासह समिती सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts: