|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » भविष्य

भविष्य 

मेष

या आठवडय़ात शनिचे राश्यांतर आपल्यावर झालेले खोटे आरोप दूर करेल. नोकरीतील गैरसमज कमी होतील. राजकीय क्षेत्रात आपल्या विचारांना महत्त्व येईल. रविवारी व सोमवारी प्रकृतीची काळजी घ्या. फास्ट फूड टाळण्याचा प्रयत्न करा. पोटाचा त्रास होईल. शेतकरीवर्गाने अनुभवी व विचारवंताच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रेमप्रकरणात मनाची चलबिचल वाढेल. निर्णय चुकू शकतो. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


वृषभ

शनि ग्रहाचे राश्यांतर नोकरीत  व्यवसायात अडचणी निर्माण करणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. वेळेवर कामे पूर्ण केल्यास फारसा त्रास होणार नाही. अडलेल्या व्यक्तीला मदत करा. त्याला अधिक अडवून त्रास देऊ नका. प्रिय व्यक्तीबरोबर आपले विचार मांडा. राजकीय क्षेत्रात शत्रुपक्ष आपल्यावर काही क्षेपणास्त्रांचा मारा करू शकतात व आपणास अडचणीत आणू शकतात. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. त्याकरिता आपली आध्यात्मिक शक्ती वाढवावी लागणार आहे.


मिथुन

माणूस चालतो पण त्याला सुधारण्याची संधी मिळते. त्यावेळेस सुधारले नाही तर ग्रह त्याला चांगलीच शिक्षा देतात. आताच्या काळात आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. शेतकरी वर्गाने पैशाच्या क्यवहारात सावध रहावे. मुलांनी खेळाकडे कमी लक्ष द्यावे. अभ्यासावर जास्त जोर द्यावा. तरच यंदा यश पदरी पडेल. नवीन ओळखी देतील, मित्रही मिळतील. मात्र कोणावर विसंबून राहून कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. कायद्याचे पालन करा.


कर्क

व्यवसायात अविचाराने वागल्यास नुकसान संभवते. शनि व शुक्राचे राश्यांतर घरातील वातावरण थोडे तणावाचे करण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारात नातेवाईकांबरोबर वाद गैरसमज संभवतात. कोर्टकचेरीच्या कामात हलगर्जीपणा करून चालणार नाही. कला क्रीडा क्षेत्रात मिळेल ती संधी घ्या. मनाप्रमाणे काम मिळणे थोडे अवघड आहे. नोकरीत आठवडय़ाच्या शेवटी वरि÷ आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी टाकण्याची शक्मयता आहे.


सिंह

राजकीय क्षेत्रात सावधपणे डावपेच टाका. परिस्थितीचा योग्य प्रकारे अभ्यास करा. नोकरीत वरि÷ांशी चर्चा करताना वाद वाढू शकतो. सोमवारी व मंगळवारी प्रकृतीची काळजी घ्या. मानसिक ताण वाढू शकतो. शनिचे राश्यांतर आपल्या काही अडचणी दूर करणार आहे. मात्र या आठवडय़ात कोणताही धाडशी निर्णय घेऊ नये. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. शेतकरीवर्गाला दिलासा मिळेल.


कन्या

कुटुंबातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात थोडा चढउतार राहणार आहे. शनिच्या राश्यंतराने नोकरीत गैरसमज, खोटे आरोप, होण्याची शक्मयता आहे. बुधवारी व गुरुवारी कामाचा व्याप वाढेल. घरातील कामांकडे थोडे दुर्लक्ष होईल. विद्यार्थीवर्गाला प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच यश मिळेल. बाहेर गावी जाण्याचा योग जुळून येईल.


तूळ

येत्या 26 जानेवारीला शनिचे राश्यांतर होत आहे व आपली साडेसाती संपणार आहे. आपण जो ताण तणावाचा काळ काढला  व नवीन शिकण्यास मिळाले ते आता आपल्या आयुष्यात उपयोगी ठरणार आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. कला क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक वाढेल. पूर्वीचे गैरसमज दूर होतील. विद्यार्थीवर्गाला विजयश्री खेचून आणता येईल.


वृश्चिक

या आठवडय़ात साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे. शनिचे राश्यांतर आपणास मोठे निर्णय घेण्यास मदत करेल. राजकीय क्षेत्रात मात्र चर्चा करून व अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने निर्णय घेतल्यास ते चुकणार नाहीत. कुटुंबातील नाराजी दूर करता येईल. प्रेमाला चालना मिळेल. कलाक्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकचेरी अथवा इतर पेच प्रसंग मिटवण्याचा प्रयत्न करा. धंद्यात फायदा संभवतो.


धनु

साडेसातीचा दुसरा टप्पा या आठवडय़ात सुरू होणार आहे. या काळात प्रकृतीची काळजी घ्या. गोड बोलून तुम्हाला प्रेमाच्या जाळय़ात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. सुखाचे स्वप्न नुसते पाहून उपयोग नसतो. त्यासाठी मेहनत करावी लागते. राजकीय क्षेत्रात आपले डावपेच यशस्वी ठरू शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी आठवडय़ाच्या शेवटी मिळू शकते. शेतकरी वर्गाने जमिनीच्या व्यवहारात सावध रहावे.


मकर

या आठवडय़ात शनिचे राश्यंतर होत आहे व आपणास साडेसाती सुरू होत आहे. साडेसाती ही पूर्णत: वाईट असते असे काही नाही. आपणास ती योग्य व अयोग्य दोन्ही दिशांचा अभ्यास करून देते. गुरुवारी, शुक्रवारी आपल्या निर्णयाचा विरोध होऊ शकतो. कठोर निर्णय न घेता लोकांशी जुळून घेऊन व  त्यांचे विचार घेऊन निर्णय घ्या. म्हणजे  फारसा विरोध होणार नाही. विद्यार्थी वर्गाला परिक्षेत यश मिळण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.


कुंभ

या आठवडय़ात समस्या कमी होतील. व्यवसायाच्या संबंधी  चांगला निर्णय घेता येईल.समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकाल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहिले तरी  इतरांचा दबाव राहील. काही प्रश्न आधांतरीत वाढतील. मुलांच्या समवेत चर्चा करून घरातील व धंद्यातील प्रश्न सुटू शकेल. कोर्टकचेरीच्या कामात गुरुवारी व शुक्रवारी सावध रहा. प्रत्यक्षात दगदग संभवते. नवे मित्र मिळतील. आपसातील क्यक्तींची नाराजी पाहून त्यांचे विचार जाणून घ्यावे.


मीन

घरातील किरकोळ अडचणीवर मात करता येईल. जमिनीचा व प्रॉपर्टीचा व्यवहार लवकर पूर्ण  करा. कायद्याच्या बाबतीतील काम या आठवडय़ात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तीबरोबर शृंगारिक जीवनाचा आनंद घेता येईल. घरात शुभ समाचार मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात नियमितपणा ठेवल्यास मोठे यश मिळेल. प्रवासाचे बेत आखले जातील. नाटय़ चित्रपट क्षेत्रात नवीन कामे मिळतील.