|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » आरबीआयमध्ये घुसणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज

आरबीआयमध्ये घुसणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नोटाबंदीविरोधात आंदोलन करणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आरबीआयच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई आणि नागपूरमध्ये काँग्रेसकडून घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर हे आंदोलन चिघळू नये, यासाठी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर जोपर्यंत लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.