|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणूक होणाऱया राज्यांमध्ये 64 कोटी जप्त

निवडणूक होणाऱया राज्यांमध्ये 64 कोटी जप्त 

नवी दिल्ली

  विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असणाऱया पाच राज्यांमध्ये आतापर्यत 64 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. यातील 56.04 कोटी रुपये उत्तर प्रदेशमधून हस्तगत केले असल्याची माहिती बुधवारी निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये या राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या राज्यांमध्ये 17 जानेवारीपर्यंत 64.38 कोटी रूपयांची रोकड 6.23 कोटींचे मद्य, दोन कोटींचे अंमलपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 56.04 कोटींची रोकड जप्त केली.

यामध्ये 31.65 लाख रूपये जुन्या नोटांचा समावेश आहेत.

पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये अनुक्रमे 8.17 कोटी, 10 लाख, 6.95 लाख रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच पंजाबमध्ये 1.78 कोटी, गोवा, मणिपूरमध्ये अनुक्रमे 16.73 लाख, 7 लाखांचा अंमलीपदार्थांचा साठा जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारांनी खर्च केलेल्या पैशांच्या हिशोब तपासणीसाठी 200 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. काळा पैसाचे वाटप, मतदारांना लाच स्वरूपात देणात येणारे पैशांवर या निरीक्षकांची नजर असणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.