|Sunday, February 17, 2019
You are here: Home » Top News » अजून किती प्रवाशांचा बळी घेणार ? , सिंधुताईंचा संतप्त सवाल

अजून किती प्रवाशांचा बळी घेणार ? , सिंधुताईंचा संतप्त सवाल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱया सिंधुताई सपकाळ यांनी मुंबई – पुणे एक्सप्रेसवरील उर्से टोलनाक्यावर आयआरबी कर्मचारी आणि व्यवस्थापकांना फैलावर घेतले. मुंबई – पुणे एक्सप्रेस आणखी किती जणांचे जीव घेणार? असा संतप्त सवाल सिंधुताई यांनी टोलनाक्यावर आयआरबी कर्मचाऱयांना विचारला.

बुधवारी रात्री मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्यासमोर एका वाहनाचा आपघात होणार होता. मात्र हा आपघात थोडक्यात टळला. या गाडीमध्ये जवळपास वीस महिला आणि लहान मुले होती. ही घटना पाहून सिंधुताई सपकाळ संतापल्या. यानंतर गाडीतून उतरून सिंधुताईंनी टोलनाक्यावरील कर्मचऱयांना खडे बोल सुनावले. ‘ एक्सप्रेस वेचा वापर करणारे टोल भरतात. तुम्ही आणखी किती लोकांचा जीव घेणार आहात?’असा संतप्त सवाल सिंधुताईंनी उर्से टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना विचारला. येत्या 8 दिवसांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यास हजारो नागरिकांसह महामार्गावर उतरून आंदोलन इशारादेखील सिंधुताईंनी दिला.

Related posts: