|Saturday, February 16, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानमधील गरिबी दूर केल्यास ते भारताशी युद्धाचा विचार करणार नाहीत : रामदेवबाबा

पाकिस्तानमधील गरिबी दूर केल्यास ते भारताशी युद्धाचा विचार करणार नाहीत : रामदेवबाबा 

ऑनलाईन टीम / पुणे :

पाकिस्तानमधील गरिबी दूर झाल्यास भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रtत्त्व संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तान भारताशी युद्धाचा विचार देखील करणार नाही, असे वक्तव्य योगगुरु रामदेवबाबा यांनी केले.

पुण्यात सुरु असलेल्या 7 व्या छात्र संसदेत रामदेवबाबा बोलत होते. ते म्हणाले, पाकिस्तानामधील गरिबी दूर झाल्यास ते कधीही भारताशी युद्ध करण्याचा विचार करणार नाहीत. यावेळी त्यांनी पतंजली समूहाच्या भविष्यातील वाटचालीविषयी माहिती दिली. येत्या काळात पतंजली समूह बांगलादेश, नेपाल आणि आफ्रिकेमध्ये योगाचा आणि व्यवसायाचा विस्तार करणार आहे. पतंजली समूहाला मिळणारा नफा गरीबांच्या विकासासाठी वापरण्यात येईल. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही पतंजली समूहाचा विस्तार करण्याची आमची योजना असल्याचे ते म्हणाले.

Related posts: