|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कायद्याच्या राज्याची संकल्पना आंमलात आणावी लागेल

कायद्याच्या राज्याची संकल्पना आंमलात आणावी लागेल 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

लोकशाहीची पाळेमुळे रूजवायची असेल तर कायद्याच्या राज्याची संकल्पना आंमलात आणवी लागेल. असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात यांनी ‘भारतीय लोकशाहीवरचे संकट’ या विषयी बोलताना केले. शिवाजी विद्यापीठ आणि शहाजी लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिन्सिपल एस. व्ही. आपटे व्याख्यान पार पडले. यामध्ये बुधवारी झालेल्या या व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. वाय. एस. पी. थोरात यांनी यावेळी भारतातील लोकशाही, महिला, शिक्षण पद्धती, धार्मिक तेढ, राजकीय लोकशाही आदी विषयांवर आपले विचार मानले. अध्यक्षस्थानी बोलताना रजनी मगदूम यांनी आपले महाविद्यालय शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले. यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सदस्य ऍड. व्ही. एन. पाटील,प्रा. डॉ. सिमा येवले, डॉ. उमा यादव, कर्नल शिवाजी थोरात, डॉ. जयसिंग पवार, प्रा. स्वाती कुलकर्णी, ऍड. स्वप्निल चिले तसेच कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर नारायणा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. सविता रासम यांनी सुत्रसंचालन तर प्रा. डॉ. एम. सी. शेख यांनी आभार मानले.