|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » सायना, जयराम उपांत्यपूर्व फेरीत

सायना, जयराम उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था /सेरवेक :

भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अजय जयराम यांनी येथे सुरू असलेल्या नव्या वर्षांतील बॅडमिंटन हंगामाच्या पहिल्या मलेशिया मास्टर्स ग्रा प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

लंडन ऑलिंपिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती आणि माजी टॉप सीडेड सायना नेहवालने गुरूवारी येथे महिला एकेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या हॅना रामदीनीचा 42 मिनिटांच्या कालावधीत 21-17, 21-12 अशा गेम्स्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सायनाचा पुढील फेरीतील सामना इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित फित्रानी बरोबर होणार आहे.

पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताच्या सहाव्या मानांकित अजय जयरामने चीन तैपेईच्या हेसुआनचे आव्हान 21-12, 15-21, 21-15 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र महिला दुहेरीत भारताच्या अपर्णा बालन आणि प्राजक्ता सावंत यांचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले. चीन तैपेईच्या हेसिन आणि हॅन यांनी बालन व सावंत यांचा 21-18, 21-14 असा पराभव केला. पुरूष दुहेरीत इंडोनेशियाच्या गुणवान आणि किडो यांनी भारताच्या मनु अत्री व सुमीत रेड्डी यांच्यावर 21-17, 18-21, 21-12 तसेच दुहेरीच्या अन्य एका सामन्यात हाँगकाँगच्या हिम आणि रिग्नाल्ड यांनी भारताच्या एम.आर. अर्जुन व एस. रामचंद्रन यांच्यावर 21-14, 21-17 अशी मात केली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या ही आणि तेन यांनी भारताच्या प्राजक्ता सावंत व योगेंद्रन कृष्णनन यांचा 21-17, 21-17 त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या अहमद आणि विडेजा यांनी भारताच्या ज्वाला गुठ्ठा व मनु अत्री यांचा 21-18, 21-10 असा पराभव केला.

Related posts: