|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » फिफाच्या अर्थसमितीवर प्रफुल्ल पटेल

फिफाच्या अर्थसमितीवर प्रफुल्ल पटेल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाच्या अर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघटनेचे अध्यक्ष आहेत.

प्रफुल्ल पटेल यांची मागील वर्षी डिसेंबरमध्ये आशियाई फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल यांची फुटबॉल महासंघात महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांनी 17 वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळवून देण्यासाठी पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर आता त्यांची फिफाच्या अर्थ समितीवर निवड करण्यात आली आहे.

Related posts: