|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात राष्ट्रवादीची धुरा प्रभारी भास्कर जाधवच सांभाळणार

जिल्हय़ात राष्ट्रवादीची धुरा प्रभारी भास्कर जाधवच सांभाळणार 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

चिपळूणमधील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांच्या वादावर रत्नागिरी दौऱयावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सोक्षमोक्ष लावला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका लढविण्यासाठी राष्ट्रवादी जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. त्यांच्याच माध्यमातून राष्ट्रवादी मजबूत करणार असल्याचे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी माजी आमदार रमेश कदम यांना राष्ट्रवादीचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे शुक्रवारी रत्नागिरी दौऱयावर आले होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी येथील प्रमुख पदाधिकाऱयांशी संवाद साधला. निवडणूकांच्या मोर्चेबांधणीबाबत त्यांनी चर्चाही केली. त्यावेळी चिपळूणमधील आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांच्या वादावर स्पष्टीकरण दिले. त्यांच्या वादामुळे संघटनेत काहीसी संभ्रमावस्था तयार झाली होती. पण आता माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत आपला प्रवाह बदलला आहे. त्यामुळे जिल्हय़ाचे प्रभारी भास्कर जाध्घ्व यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्याचवेळी त्यांनी चिपळूणमधील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते चारही नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आलेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीसोबतच राहण्याची भूमिका ठेवावी लागणार आहे. आगामी निवडणूकीसाठी प्रभारी भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम व सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत निवडणूकीची मोर्चेबांधणी केली जात आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत अत्यंत उत्तम नियोजनासाठी मेळावे घेतले जात आहेत. त्यामुळे आता जिल्ह्य़ात राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणाने सक्रिय झाला आहे. आगामी निवडणूकीत चांगली कामगिरी करण्याचा मानस तटकरे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हय़ाच्या उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात राष्ट्रवादीत मध्यंतरीच्या काळात काही सहकाऱयांनी संघटनेला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षात पोकळी निर्माण झाली होती. मात्र आता टप्प्याटप्प्याने ही पोकळी भरून काढण्यात येणार असल्याच्sा त्यांनी सांगितले.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात आघाडी होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत ही चर्चा मार्गी लावण्याचा मानस आहे. 1 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ होणार असल्याने त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष उमेश शेटय़े, तालुकाध्यक्ष बबलू कोतवडेकर आदी उपस्थित होते.

मोंदींच्या नजरेला भिडण्याचे धाडस अनंत गीतेंकडे नाही

नोटाबंदीचा निर्णयाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देणारा पहिला मंत्री असल्याचे सांगितले होते. आपण नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे पंतप्रधानांना जाऊन सांगा असे त्यांना सुचित केले होते असे तटकरे म्हणाले. पण मोदींच्या नजरेला नजर देण्याचे धाडस गींतेंमध्ये नसल्याचा टोला तटकरे यांनी लगावला आहे. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे असे सांगायचे धाडसही गीतेंमध्ये नसल्याचेही तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

 

 

Related posts: