|Monday, December 10, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पंचम खेमराजमध्ये रंगला मालवणी खाद्य महोत्सव

पंचम खेमराजमध्ये रंगला मालवणी खाद्य महोत्सव 

सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे पारंपरिक मालवणी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन श्रीमंत शुभदादेवी भोसले, सहसंचालक प्रा. डी. टी. देसाई, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, सांस्कृतिक समिती समन्वयक डॉ. एस. ए. ठाकुर, प्रा. नीलम धुरी, प्रा. बी. एन. हिरामणी, प्रा. आर. बी. शिंत्रे, प्रा. डी. डी. गोडकर, प्रा. एम. ए. ठाकुर, डॉ. जी. एस. मर्गज, प्रा. डी. जी. बोर्डे, प्रा. एस. एम. बुवा, प्रा. एन. एस. टकेकर, प्रा. पूनम सावंत, प्रा. यु. सी. पाटील, प्रा. व्ही. पी. सोनाळकर, प्रा. निकम, प्रा. चौधरी तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या मालवणी खाद्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी एकूण 15 स्टॉल्स लावले होते. त्यात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व उत्कृष्ट मालवणी पदार्थ तयार केले. त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची झुंबड उडाली होती. या खाद्य महोत्सवात मालवणी पिझ्झासह मच्छी तसेच मांसाहारी पदार्थ, सरबते हे पदार्थ खवय्यांसाठी आकर्षण ठरले. या महोत्सवाच्या माध्यमातून मुलांना प्रायोगिक तत्त्वावर व्यवसाय व मार्केटिंगचा सराव व्हावा व उद्योजकता निर्माण व्हावी, हा उद्देश होता.

Related posts: