|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे वाहतूक सप्ताहानिमित्त जनजागृती

महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे वाहतूक सप्ताहानिमित्त जनजागृती 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्यावतीने वाहतूक सप्ताहानिमित्त ट्रक्टर, ट्रॉली व ट्रक्स या सारख्या अवजड वाहनांना रिप्लेक्टर लावण्यात आली. तसेच वाहतूकीच्या नियमांबाबत जनजागृतीही करण्यात आली.

यावेळी अवजड वाहनांपैकी ज्या वाहनांना रिप्लेक्टर नव्हती. अशा वाहनांना रिप्लेक्टर लावण्यात आली. तसेच वाहतूकीचे नियमांचे पालन करण्यासाठी वाहनचालकांना पुष्पगुच्छ देवून जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, दुर्गेश लिंग्रज, रघुनाथ टिपुगडे, विनोद खोत, भगवान कदम, योगेश शिंदे आदींचा समावेश होता.