|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाआघाडी करुन परिवर्तन घडवा -खोत

महाआघाडी करुन परिवर्तन घडवा -खोत 

प्रतिनिधी / वडूज

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱयांची कामे होण्यासाठी खटाव तालुक्यातील भाजपा, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर समविचारी पक्षांनी महाआघाडी करुन निवडणूक लढवून परिवर्तन घडवावे, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

वडूज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात आयोजित कार्यकत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भगत, भाजपा तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड, युवराज पाटील, रिपाईचे राजेंद्र जगताप, विजयराव पवार, सुनील मोरे, वैभव पाटील, प्रदीप शेटे, अण्णा काकडे उपस्थित होती.

खोत म्हणाले, खटाव पंचायत समितीवर अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्या कार्यकालात शासनाच्या योजनांचा फायदा फक्त गावोगावच्या टग्यांना मिळाला. सर्वसामान्य शेतकर्यांचा विकास होण्यासाठी दोन्ही ठिकाणी परिवर्तन घडविणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनेत अनागोंदी करणाऱयांना धडा शिकवणार असल्याचाही इशारा दिला.

संजय भगत यांनी भाषणात परिवर्तनासाठी भाजपा-शिवसेनेतील गटबाजी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास मोहनराव निकम, सागर जगदाळे, बाळासाहेब काळे, मंदार जोशी, दादासाहेब बागल, आबा पाटील, संजय गुरव, सोमनाथ रणनवरे, बुवा खराडे, पोपट फडतरे, ज्ञानदेव काळे, अशोक काळे, गणेश फडतरे, किरण जाधव आदी उपस्थित होते.

….अनं हौसे गवसे जादा

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सदाभाऊंच्या या दौऱयाकडे तानाजीराव देशमुख यांच्यासारख्या अनेक निष्ठावंत मावळ्य़ांनी पाठ फिरविली होती. तर भाजपा व इतर पक्षातील हौश्या-गौश्यांनी मोठी गर्दी केली होती. याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरु होती.

Related posts: