|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त

औरंगाबादेत 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

दोन हजार रुपयांच्या नव्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या. ही कारवाई औरंगाबाद येथील जिन्सी भागातून करण्यात आली.

जिन्सी भागातील तरुण दोन हजार रुपयांच्या नव्या बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या 35 नोटा, प्रिटिंग मशिन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.