|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » यूपीत सपा-काँग्रेसमध्ये आघाडी ; जागावाटपावर एकमत

यूपीत सपा-काँग्रेसमध्ये आघाडी ; जागावाटपावर एकमत 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याचे निश्चित झाले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन एकमत झाले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात आता ‘सायकल’वर काँग्रेसचा ‘हात’ असणार आहे.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबतची घोषणा केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्यात बैठक झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावरुन एकमत झाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष विधानसभेच्या 298 जागा लढवणार असून काँग्रेस 105 जागा लढवणार आहे.