|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाटच्या गणेश बचत गटाला राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार

पाटच्या गणेश बचत गटाला राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार 

कुडाळतालुक्यातील पाट येथील श्री गणेश महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला कोकण विभागाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबई येथे झालेल्या महालक्ष्मी सरस बचत गट मेळाव्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 25 हजाराचा धनादेश व प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले.

या गणेश बचतगटाला 2017 मध्ये विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. या बचत गटात 12 सदस्य असून सामुदायिक शेती, भाजीपाला लागवड, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून महिलांनी आपला व्यवसाय वाढविला. गटाची दर आठवडय़ाला बैठक हेते. व्यवसाय, कर्जपरतफेड तसेच नवीन व्यवसायबाबत चर्चा केली जाते. या शिवाय श्रमदानाने कच्चे व पक्के बंधारे बांधणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे, ग्रामस्वच्छता अभियान, प्रभातफेरी या सारखे उपक्रम राबवून सामाजिक विकासकामात महत्वपूर्ण योगदान दिले.

मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळय़ाच्यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास सचिव आसिम गुप्ता, ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला उपस्थित होते. जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी व अधिकारी यांचे सहकार्य लाभले. बचत गटातील सदस्यांचे पाट सरपंच कीर्ती ठाकुर व उपसरपंच पुंडलिक पेडणेकर यांनी अभिनंदन केले.

Related posts: