|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » पेस-हिंगीस दुसऱया फेरीत, सानिया दुहेरीत पराभूत

पेस-हिंगीस दुसऱया फेरीत, सानिया दुहेरीत पराभूत 

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत रविवारचा दिवस भारतीयांसाठी संमिश्र ठरला. लियांडर पेसने मिश्र दुहेरीत विजयी सुरुवात केली तर सानिया मिर्झाचे महिला दुहेरीतील आव्हान तिसऱया फेरीतच संपुष्टात आले.

अनुभवी लियांडर पेस व तिची स्विस साथीदार मार्टिना हिंगीस यांनी मिश्र दुहेरीची पहिली लढत जिंकताना डेस्टानी आयव्हा-मार्क पोलमन्स या ऑस्ट्रेलियन जोडीवर 6-4, 6-3 अशी मात करीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. सरळ सेट्समधील हा सामना जिंकण्यासाठी त्यांना केवळ 51 मिनिटे लागली. पेस-हिंगीस जोडीने 2 बिनतोड सर्व्हिस केल्या तर 20 विजयी फटके मारले आणि 9 अनियंत्रित चुका केल्या. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी 15 विजयी फटके मारले व 12 अनियंत्रित चुका केल्या.

महिला दुहेरीत मात्र सानिया मिर्झाला स्पर्धेबाहेर पडावे लागले. चौथे मानांकन मिळालेल्या सानिया व बार्बरा स्ट्रायकोव्हा यांना जपानच्या बिगरमानांकित ई. होझुमी व एम. काटो यांच्याकडून 3-6, 6-2, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला. ही लढत सुमारे दोन तास रंगली होती.

Related posts: