|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आपल्यावरील आरोप खोटे, राजकीयदृष्टय़ा प्रेरित

आपल्यावरील आरोप खोटे, राजकीयदृष्टय़ा प्रेरित 

प्रतिनिधी/ कुडचडे

 

कुडचडेतील काही गट आपल्याविरुद्ध अपप्रचार करत असल्याचे आपल्याला आढळून आले असून आपल्यावर करण्यात येणारे आरोप खोटे व राजकीयदृष्टय़ा प्रेरित आहेत, असा दावा कुडचडेतील भाजपाचे उमेदवार नीलेश काब्राल यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

शेळवण येथे कोळसा प्रकल्प आणण्यास आपलाही विरोध असून गतवर्षी आपण स्थानिक पंचायतीच्या सहमतीने त्याच्या पर्यावरणविषयक दाखल्याला हरित लवादापुढे आव्हान दिलेले आहे. आपले विरोधक हा मुद्दा बाजूला ठेवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काब्राल यांनी यावेळी केला.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आशिष करमली, मंडळ अध्यक्ष अशोक नाईक, नगरसेवक फेलिक्स फर्नांडिस, विश्वास देसाई, ओंकार वस्त हे उपस्थित होते. गोवा सरकारच्या औद्योगिक धोरणानुसार शेळवण येथे असा कोळसा प्रकल्प कदापि येऊ शकत नाही, असे काब्राल पुढे म्हणाले. नियोजित कचरा प्रकल्पाविषयी बोलताना ते म्हणाले की, काकोडा येथे सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प लोकांना नको असेल, तर आपल्याही तो नको आहे. आपण आपल्या खर्चाने पालिका क्षेत्रातील घरोघरी कचरा गोळा करून त्याच जागी टाकतो. हे काम व्यवस्थित चालू आहे आणि पुढेही चालू राहील. मात्र सदर जागेला पुढे सोनसडय़ाचे स्वरूप येऊन दुर्गंधीचे साम्राज्य माजल्यास त्याची जबाबदारी विरोधकांनी घ्यावी.

चोवीस तासांपूर्वी काही पंच व सरपंचांनी काब्राल यांना भेटून त्यांना पाठिंबा दर्शविला होता. एका रात्रीत त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते काब्राल यांच्या विरोधातील फेरीत सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. हा बदल कसा काय घडला ते समजत नाही, अशी प्रतिक्रिया करमली यांनी व्यक्त केली.

Related posts: