|Sunday, August 25, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » वैज्ञानिकांनी बनवले सर्वात कमी वजनाचे घडय़ाळ

वैज्ञानिकांनी बनवले सर्वात कमी वजनाचे घडय़ाळ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

वैज्ञानिकांनी जगातील सर्वात कमी वजनाचे घडय़ाळ तयार केले असून 40 ग्रॅम वजनाचे हे यंत्रिक घडय़ाळ आहे. ग्राफिन या पदार्थापासून ते बनवण्यात आले आहे.

ग्राफ टीपीटी नावाने ग्राफिन संमिश्र ओळखले जाते व त्याचे वजन घडय़ाळ एरवी वापरल्या जाणाऱया पदार्थपेक्षा कमी आहे. एक अणूइतके ग्राफिन हे जड असलेले व्दिमितीय घटक आहे. ग्राफिन प्रथम 2004 मध्ये वगळे काढण्यात यश आले होते त्यानंतर त्याचे अनेक उपयोग सामोरे आले. वाहने, विमाने, लवचिक मोबाईल फोन व टॅबलेट, ऊर्जा संकलन उपकरणे यांचा त्यात समावेश आहे. नवीन घडय़ाळाचा पट्टा ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापिठाने तयार केला असून त्यात रीचर्ड मिली व मॅकलीन एफ 1 या उत्पादक कंपन्यांचे सहकार्य आहे. त्यात गाफिन वापर केला आहे.