|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » टी – 20 मालिकेसाठी अश्विन , जडेजाला विश्रांती

टी – 20 मालिकेसाठी अश्विन , जडेजाला विश्रांती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारत आणि इंग्लंड संघामध्ये 26 जानेवारी पासून होणाऱया तीन टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या संघात अश्विन आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे.

आगामी सहा महिन्यात भारताचे वेळापत्रक व्यस्त आहे. अधीच संघातील मुख्य खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत आणि 9 तारखेपासून बांगालादेश आणि ऑस्टेलिया विरूध्द भारताला कसोटी सामने खेळाचे आहेत. त्यामुळे निवड समितीने जडेजा आणि अश्विन या दोन प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. अश्विन आणि जडेजा ऐवजी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांचा भारताच्या टी – 20 संघात समावेश करण्यात आला आहे.

Related posts: