|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पॅलेस्टाईनमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्राची छायाचित्रे समोर

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्राची छायाचित्रे समोर 

गाजा/ वृत्तसंस्था

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या प्रशिक्षण केंद्राची नवी छायाचित्रे समोर आली आहेत. हमास मोठय़ा संख्येने बेरोजगार युवकांची भरती करत असल्याचे प्रसारमाध्यम अहवालात म्हटले गेले. एवढेच नाही तर संघटनेत आता लहान मुलांची देखील भरती केली जात असून त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

ब्रिटनमधील एका प्रसारमाध्यमानुसार हमासच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुलांचा देखील समावेश आहे. हमास मुलांमध्ये इस्रायलविरोधात विषाची पेरणी करत आहेत. प्रशिक्षण तळांमध्ये 12 ते 20 वयोगटातील मुलांना रायफल चालविण्याचे देखील प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर ग्रेनेड फेकण्यापासून आयईडी स्फोट घडविण्याचे तंत्रज्ञान देखील शिकविले जात आहे. या तरुणांना किनारी भागाची सुरक्षा करण्याची शपथ देण्याबरोबरच त्यांना ज्यूंसोबत पुढील युद्धासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

हमासला अमेरिका आणि इस्रायलबरोबरच आणखी अनेक देशांनी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हमासवर या तळांद्वारे निराश आणि बेरोजगार युवांना हल्ल्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप होत आला आहे.