|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावात 17 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषिक मराठा क्रांती मोर्चा’

बेळगावात 17 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषिक मराठा क्रांती मोर्चा’ 

सीमाप्रश्नाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चा निघत आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव येथे शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी रोजी मराठी भाषिक मराठा क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्नाच्या मागणीशीवाय मोर्चा काढण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरू केल्यामुळे कर्नाटक सरकारचा लाभ होऊ नये आणी चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी सीमाप्रश्न सोडवणूकीची आग्रही मागणी निवेदनामध्ये असणार असून यासह इतर मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात येत आहे. मोर्चा मध्ये लाखेंच्या संख्येने मराठी भाषिक व मराठा समाज सहभागी व्हावा, यासाठी मंगळवार दि. 24 पासून जनजागृतीस सुरुवात करण्यात येणार आहे. मोर्चामध्ये बेळगाव व सीमाभागातील मराठी बांधवांसह महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील नागरिक सहभागी होणार आहे.

बेळगाव येथे सीमाप्रश्नाची मागणी बाजूला ठेऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न काहीजणांनी सुरू केला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये सीमाप्रश्नाची मागणी समाविष्ट करावी असे सातत्याने मोर्चाच्या संयोजकांना सांगण्यात आले. मात्र, सीमाप्रश्नशीवाय मोर्चा काढण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी जत्ती मठ येथे  मराठा समाज बांधवांची बैठक झाली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते.

बेळगावात सीमाप्रश्नाच्या मागणीशीवाय क्रांतीमोर्चा काढल्यास 60 वर्षे देत असलेल्या संघर्षाचे काय. सीमाप्रश्न चार पिढय़ा लढत आहेत. मराठी माणसाचा आवाज बुदलंद करण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच न्यायालयात प्रश्न अंतिम टप्प्यावर आला असतांना काहीजण जाणीवपूर्वक कर्नाटक सरकाच्या फायद्यासाठी सीमाप्रश्नाची मागणी वगळून मोर्चा काढण्याचा खोडसाळपणा करीत असल्याबद्दल बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या मराठी बांधवांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. व मोर्चाची तारीख त्वरीत जाहीर करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दीपक दळवी यांनी मराठा मोर्चा काढण्याच्या नावाखाली काही राजकीय पक्षातील लोक मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. अशांपासून दूर राहिले पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व मोर्चामध्ये सीमाप्रश्न सोडवणुकीची मागणी आग्रही आहे. त्यामुळे येथेही सीमाप्रश्न वगळून मोर्चा काढणे चुकीचे ठरेल. यासाठी सर्वांनी सर्व मराठी भाषिकांना घेऊन मोर्चा यशस्वी करावा, असे मत व्यक्त केले.

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी सीमाप्रश्नाची मागणी नसेल तर दुसऱयांच्या मोर्चाला पाठिंबा न देता लगेचच मोर्चाची तारीख जाहीर करावी व मोर्चाची रुपरेषा ठरवावी, असे मत व्यक्त केले.

प्रकाश मरगाळे, सतीश कुगजी, भागोजी पाटील, कृष्णा हुंदरे, रामा शिंदोळकर, दत्ता पवार, प्रकाश पाटील, विलास बेळगावकर, राजेंद्र मुतगेकर, शिवराज पाटील, अरुण कानुरकर, मदन बामणे,  आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला मराठा समाजातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.