|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आरवडेत 26 जानेवारी रोजी भव्य हरे कृष्ण महोत्सव

आरवडेत 26 जानेवारी रोजी भव्य हरे कृष्ण महोत्सव 

वार्ताहर/ मांजर्डे

आरवडे ता. तासगाव येथील श्री श्री राधा गोपाल मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ब्राम्होत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. या महोत्सवास अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी देशांमधुन भक्तगण येतात. मंदिरात पहाटे चार ते नऊ वाजेपर्यंत मंगलारती, तुलसी आरती, हरीनाम जप, गुरु पूजा, भागवत क्लास इत्यादी दररोज चालणारे कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन ही संस्था संपूर्ण जगभरात 180 देशांमध्ये गीता-भागवताचा प्रचार करत आहे. या संस्थेचे आरवडे येथील श्री राधा गोपाल मंदिर म्हणजे दक्षिणात्य व उत्तर भारतीय बाधकांमाचा उत्कृष्ट नमुना आहे. 26 जानेवारी रोजी भजन कीर्तन, नाटक बाल वारकऱयांचे नृत्य, भरतनाटय़म व अनेकविध कला सादर होणार आहेत. तसेच प.पु.लोकनाथ स्वामी महाराजांचे आशीर्वचन पर प्रवचन, प.पु.रामगोविंद स्वामी महाराज, श्रीमान रुपरघुनाथ प्रभू यांची वक्तव्ये होणार आहेत. तसेच श्री राधागोपालांना अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या वर्षी हरे कृष्ण! महोत्सवामध्ये श्री चैतन्य महाप्रभुंच्या पादुका मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा व उद्घाटन समारोह प.पुज्य. लोकनाथ स्वामी महाराजांच्या हस्ते होणार आहे. स्वतः भगवंत पांडुरंग-कृष्ण सुमारे 500 वर्षापुर्वी पुन्हा श्री चैतन्य महाप्रभु या नावाने प्रकट झाले होते. त्यांनी संपुर्ण दक्षिण भारताचे भ्रमण करतेवेळी आरवडे गावाला भेट दिली होती. त्यांच्या या ऐतिहासीक भेटी प्रित्यर्थ या पादुका मंदिराची स्थापना व महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर महोत्सव समितीचे अभिराम ठाकूर प्रभू, कृष्ण किशोर प्रभुजी आणि दामोदर सखा प्रभुजी यांनी केले आहे.