|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माजी आमदार आनंदराव देसाई (आबाजी) यांचे निधन

माजी आमदार आनंदराव देसाई (आबाजी) यांचे निधन 

प्रतिनिधी/ गारगोटी

राधानगरी भुदरगडचे माजी आमदार, व छत्रपती शाहु वाचनालय गारगोटीचे अध्यक्ष आनंदराव कोंडिबा देसाई तथा आबाजी (वय 99) यांचे निधन झाले. माजी आमदार बजरंग देसाई यांचे ते वडिल होत. कोल्हापूर जिल्हय़ाच्या राजकारणातील व समाजकारणातील एक आदरणीय व्यक्तीमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहीले जात होते.  देसाई यांच्या निधनाने भुदरगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव सकाळी गारगोटी येथे आणण्यात येणार असुन तेथेच अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आबाजी यांच्यावर गारगोटी सोनाळी येथे त्यांच्या शेतात बुधवार दि. 25 रोजी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आबाजी एक अष्टपैलु व्यक्तीमत्व म्हणुन संपुर्ण जिल्ह्य़ाला परिचीत होते. 1962 ला त्यांची आमदार म्हणुन निवड झाली. त्यानंतर 1977 ला मौनी विद्यापीठ या प्रसिद्ध संस्थेचे चेअरमन पद भुषवले. श्री शाहु वाचनालय गारगोटी या संस्थेचे गेली 35 वर्षे कार्यकारी सदस्य ते अध्यक्षपद भुषवुन वाचनालयास दर्जेदार बनवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य, केंद्रसरकारच्या गोदाम समितीचे सदस्य, कोल्हापूर जिल्हा कारागृह समिती सदस्य, तसेच छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय समितीवर सदस्य म्हणुन त्यांनी काम पाहीले आहे.

तालुक्यात पहिले ऍननरी मॅजिस्ट्रेट होण्याचा माणही त्यांनी मिळवला. अबाल वृद्धांच्यापासुन सर्वांच्यात आबाजी या नावानेच ते प्रसिद्ध होते. राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना मोठा रस होता. देवस्थान कमिटीवर असताना पाटगाव येथिल मशिदीचे बांधकाम, निष्णप येथिल लक्ष्मी मंदिर, दोनवडेचे राम मंदिर, कुरचे लक्ष्मी मंदिर, महात्मा फुले सदन बांधकामात त्यांचे भरिव योगदान राहीले. मौनी विद्यापीठाच्या स्थापनेपासुन सातत्याने सहभागी होऊन दिनदलित व गरजु विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. कै. व्ही. टी. पाटील, माधवराव बागल, शि. रा.तावडे, बाबुरावजी जगताप यांच्या बरोबरीने त्यांनी विविध चळवळीत भाग घेतला.

माजी आमदार बजरंग देसाई, बिद्रीचे माजी संचालक प्रकाशराव देसाई यांच्या राजकिय कारकीर्दीत त्यांचे योगदान भरीव राहीले आहे. आबाजी यांच्यावर गारगोटी सोनाळी येथिल त्यांच्या शेतामध्यें त्यांच्यावर दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारास पश्चिम महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Related posts: