|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चोर..चोर मचाये शोर घरे फोडण्यासाठी नवी शक्कल

चोर..चोर मचाये शोर घरे फोडण्यासाठी नवी शक्कल 

सदरबझार परिसरात बंद प्लॅटवर डल्ला, भीतीचे वातावरण

प्रतिनिधी / सातारा

 शहराच्या पूर्व भाग हा शांत परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेक अपार्टमेंट, रो हाऊसेस आहेत. शासकीय नोकरी करणारे,  व्यावसायिकांचा रहिवास या परिसरात आहे. गेल्या पंधरा ते 20 दिवसांपासून चोरटय़ांनी चोरीसाठी नामी शक्कल वापरुन बंद प्लॅटवर निशाणा साधला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहराच्या पूर्व भागाचा विस्तार वाढू लागला आहे. अनेक अर्पाटेमंट आणि रो हॉऊसेस, बंगलो उभे राहत आहेत. या परिसरात राहणारे लोक हे शासकीय कर्मचारी, अधिकारी किंवा डॉक्टर, वकील असा वर्ग आहे. या परिसरातील  प्लॅटमध्ये राहणारे हे पतीपत्नी नोकरीनिमित्त बाहेर असतात. हेच ओळखून चोरटय़ांनी अगोदर त्या परिसरात पाहणी करण्यासाठी चार चाकी वाहनाचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. वाहने अपार्टमेंटच्या परिसरात लावून ती चोर थेट अपार्टमेंटचा कोनाकोपरा चाणक्ष   तपासतात.

दुपारच्यावेळी पुन्हा दोन ते तीन युवक त्या अपार्टमेंटमध्ये साध्या वेशात येवून. गॅस कटरच्या सहाय्याने बंद प्लॅट फोडतात. असे सत्र सुरु केल्याची चर्चा सध्या रंगत असून पोलिसांचा याकडे कानाडोळा होत आहे.नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे.

 

Related posts: