|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मानवता नष्ट होत असल्याने समस्या निर्माण

मानवता नष्ट होत असल्याने समस्या निर्माण 

बेळगाव :

संत नामदेवांनी आपला संसार नेटका करून परमार्थ साधला. फक्त संसाराकडे लक्ष न देता संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता मानवता धर्माची शिकवण दिली. आज मानवता नष्ट होत असल्यानेच अनेक समस्या निर्माण होत आहेत. स्त्रियांना योग्य स्थान न दिल्यानेच आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या पापामुळेच मुलींचे प्रमाण घटत आहे. याचा गांभीर्याने विचार सर्वच समाजबांधवांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन संत नामदेवांचे 17 वे वंशज गुरुवर्य हभप एकनाथ नामदेव नामदास महाराज (पंढरपूर) यांनी केले. श्री नामदेव दैवकी संस्था आयोजित 16 वा राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळावा रविवार दि. 22 रोजी मराठा मंदिर येथे पार पडला. यावेळी एकनाथ महाराज बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष राम हावळ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष शिवाजी हंगीरगेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, संस्थेचे सचिव विठ्ठल काकडे, उपाध्यक्ष नारायण काकडे, खजिनदार दीपक खटावकर, प्रचार प्रमुख द्वारकानाथ उरणकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शिवाजी हंगीरगेकर यांच्या हस्ते संत नामदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. द्वारकानाथ उरणकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिव विठ्ठल काकडे यांनी संस्थेची माहिती दिली.

यावेळी नेताजी जाधव म्हणाले, नामदेव दैवकी संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. सातत्याने ही संस्था विविध उपक्रम राबवत असते. वधू-वर मेळाव्याच्या आयोजनामुळेच समाज एकत्र येण्यास मदत होते, असे सांगितले.