|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » देवर्डे ग्रामपंचायतीच्या दारातच अस्वछतेचा बाजार

देवर्डे ग्रामपंचायतीच्या दारातच अस्वछतेचा बाजार 

वार्ताहर/ कुरळप

देवर्डे ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचे धिंडवडे चिकुर्डे-इस्लामपुर रस्त्यावरतीच निघाले आहेत. ग्रामपंचायतीच्या दारातच गटारी तुबूंन रस्त्यातून वाहत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. वाळवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या कडून होवू लागली आहे.

येथील ग्रामपंचायत ही जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीत आहे. ही ग्रामपंचायतीची खोली चिकुर्डे-इस्लामपुर रस्त्याच्या लगतच आहे. गामपंचयातीच्या समोरच ग्रामदैवत भैरवनाथाचे भव्य मंदीर आहे. मंदीर परिसरात मोठमोठी झाडे आहेत. ही झाडे पिंपळाची तसेच वडाची आहेत. झाडे अनेक वर्षापुर्वीची असल्याने मोठी डेरेदार आहेत. या झाडांच्या सावलीला बसण्यासाठी गांवातील अनेक जेष्ट नागरिक दिवसभर विसाव्याला बसतात. शिवाय भैरवनाथाच्या दर्शनालाही ग्रामस्थ तसेच बाहेरवाशिय येत असतात.

काही दिवसांच्या पासून या मंदीर परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. ही दुर्गंधी ग्रामपंचायतीची गटारी तुबंल्याने येत आहे. हा प्रकार ग्रामपंचायती पासून दुर अतंरावरती नसून ग्रामपंचायतीच्या दारातीलच प्रकार आहे. देवर्डे गांवातून वाहत येणारे पाणी गटारीतून तसेच गांव ओढय़ात जाते. परंतू काही दिवसांच्या पासून हे गांवातून येणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोरील गटारीत साटून राहत आहे. तेथे सांडपाणी साचून ते पाणी रस्त्यावरती येत आहे. हे पाणी एकाच ठिकाणी साचून राहील्याने यामधून एक दुर्गंधी येत आहे.

या गटारीच्या पाण्यातून येणारी दुर्गंधी आता मंदीर परिसरात अतिशय त्रासाची ठरु लागली आहे. मंदीर परिसरात दिवसभर बसणाऱया जेष्ट नागरिकांना त्रासाची ठरु लागली आहे. याशिवाय ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनाला बाहेर गांवाहून काही नागरिक येत आहेत. या नागरिकांनाही या दुर्गंधीचा सामाना करावा लागतो आहे. गांवातून येणारे हे सांडपाणी एकाचा ठिकाणी साचून राहत असल्याने ही दुर्गंधी भयानक स्वरुपाची भासत आहे. यावरती तोडगा काढण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे गेले अनेक दिवसांच्या पासून दुर्लक्ष झालेले आहे.

ग्रामपंचायतीच्या या भोगंळ कारभाराचा त्रास येथील नागरिकांना अनेक दिवसांच्या पासून सोसावा लागतो आहे. यापेक्षा आश्चर्यकारक ही गोष्ट आहे की ग्रामपंचायतीच्या शेजारीच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. ती ग्रामपंचायतीला लागूणच असल्याने ही दुर्गंधी शाळेतूनही जाणवते आहे. या दुर्गंधीचा परिणाम शाळेतील बालचंमुच्या आरोग्यावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र आलबेल असे सुरु आहे. ग्रामपंचयातीच्या दारातच अशी अस्वछतेची वरात असेल तर गांवात काय परस्थिती असेल असे बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांची मते व्यक्त होत आहेत. ‘घराची कळा अगंणा वरुन समजते’ असे म्हटले जाते. याचे भान देवर्डे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला अजिबातच नाही. असे या परस्थिती वरुन स्पष्ट होत आहे. यामध्ये त्वरीती दुरुस्ती होवून येथील नाग†िरकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. याकरीता वोळवा गटविकास अधिकाऱयांच्या कडून याकडे लक्ष देण्यात यावे अशी विनंती येथील नागरिकांच्या कडून व्यक्त करण्यात आली आहे.

Related posts: