|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » यूती तुटल्याचे दुःख झाले : शरद पवार

यूती तुटल्याचे दुःख झाले : शरद पवार 

ऑनलाईन टीम / पुणे :

शिवसेना – भाजपची यूती तुटल्यानंतर अनेक नेत्यांकडून याबाबत व्यक्तव्य सुरू असताना याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखिल आपले मत व्यक्त केले आहे. ‘एवढी वर्ष एकत्र काम करणाऱयांची युती तुटली मला अतीव दुःख वाटतं’, अशी खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी युती तुटल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, जर शिवसेना राज्यातील सत्तेतू बाहेर पडली तर तुम्ही पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले का,r ‘ आधी त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग आमच्याशी चर्चेला यावे’ तर दुसरीकडे ‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्वबळावर लढणार’. अशी गर्जना उध्दव ठाकरेंनी केली. गोरेगावच्या शिवसैनिक मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.