|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » उद्योग » सोन्याच्या बंद खाणी पुनर्जीवित करणार सरकार

सोन्याच्या बंद खाणी पुनर्जीवित करणार सरकार 

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

ब्रिटिश राज कालावधीतील सोन्याच्या बंद खाणी पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे. गेल्या 15 वर्षात देशातील अनेक खाणी बंद झाल्या आहेत. यामध्ये 120 अब्ज रुपयांचे सोने असल्याचे सांगण्यात येते. देशात मोठय़ा प्रमाणात सोन्याची आयात करण्यात येत असून त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सध्या जगात चीननंतर भारत सोन्याचा मोठा आयातदार देश आहे.

सरकारकडून चालविण्यात येणाऱया मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने डिपॉझिट्सच्या योग्य आकलनासाठी कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड्सचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला आहे असे सरकारी अधिकाऱयांनी म्हटले. यापूर्वी कोलार फिल्ड्सचे नियंत्रण भारत गोल्ड माइन्स लिमिटेडजवळ होते. सरकारने एसबीआय कॅपिटलला या अभ्यासाचे काम सोपविले आहे. या अभ्यासात कर्मचाऱयांची थकीत रक्कम आणि प्राधिकरणाकडून कंपनीला किती निधी द्यायचा आहे, याची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

कच्च्या तेलानंतर आयातीच्या बाबतीत भारत सोन्यावर अधिक प्रमाणात अवलंबून आहे. विदेशातून सोने खरेदी करण्यासाठी प्रतिवर्षी साधारण 200 अब्ज रुपये खर्च करण्यात येतात. घरगुती बचत करण्यासाठी अनेक भारतीय सोन्यात गुंतवणूक करतात. आशियातील तिसऱया मोठय़ा अर्थव्यवस्थेतील लाखो नागरिक सोन्यात गुंतवणूक करतात. भारत प्रतिवर्षी साधारण 900 ते 1,000 टन सोन्याची आयात करतो.

Related posts: