|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सिरकारची कामे घराघरांपर्यंत पोहोचवाःपालकमंत्री देशमुख

सिरकारची कामे घराघरांपर्यंत पोहोचवाःपालकमंत्री देशमुख 

प्रतिनिधी/ सांगली

केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या अनेक कल्याणकारी निर्णयामुळे ग्रामीण भागात भाजपाबद्दल नागरिकांची भुमिका सकारात्मकच आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हापरीषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर घरोघरी जाऊन सरकारच्या योजना आणि निर्णय सांगा असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

जिल्हापरीषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी सांगलीत भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर रोडवरील दैवज्ञ भवनमध्ये हा मेळावा झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे आणि योजनांमुळे ग्रामीण भागातील जनतेचे मतपरिवर्तन झाले आहेच.पण कार्यकर्त्यांनी त्याचा फायदा उठवत जि.प.आणि पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. सांगली जिल्हापरिषद भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन खा.संजय पाटील यांनी केले. जिल्ह्यात प्रत्येक जागा भाजपा पक्ष म्हणून कडवी झुंज देईल. अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तर आ.सुधीर गाडगीळ यांनी पुढील एक महिना कार्यकर्त्यांनी जोमाने राबवण्याचे आवाहन केले.

स्वागत व प्रास्तविक शेखर इनामदार यांनी केले. यावेळी दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, सौ.निता केळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दिपक शिंदे म्हैसाळकर, रमेश भाकरे,मुन्ना कुरणे, सौ.भारती दिगडे, प्रकाश बिरजे यांच्यासह कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रकाश ढंग यांनी तर आभार शरद नलवडे यांनी मानले. तततत

Related posts: