|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताच्या ‘परम’ या पहिल्या सुपर कम्प्युटरची निर्मिती करणारे प्रसिध्द वैज्ञानिक विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेकडून भारताला सुपर कम्प्युटरची विक्री करण्यास नकार मिळाल्यानंतर भटकर यांनी ‘परम’ या स्वदेशी सूपर कम्प्युटरची निर्मिती केली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.

25 जानेवारी 2017 पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असतील. काही दिवसांपूर्वीच सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू पद सोडले होते. विद्यापीठाच्या तत्कालीन व्हीसी गोपा यांनी कुलगुरूपद सोडले होते. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विद्यापीठाच्या देखरेख समितीत सभरवाल यांचा समावेश होता. मात्र, विद्यापीठाच्या नियमांप्रमाणे दुसऱयांदा मुदतवाढ न देता सभरवाल यांना पपदावरून काढून टाकण्यात आले होते. या सगळय़ा घडामोडीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून मोदी सरकारने नालंदा विद्यापीठाच्या संकल्पनेचा खेळखंडोबा करू नये, असे म्हटले होते.

Related posts: