|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » पवारांचे मध्यावधी निवडणुकांचे संकेत

पवारांचे मध्यावधी निवडणुकांचे संकेत 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

महापालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती न करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयामुळे राज्यातील युती सरकार अस्थिर बनले आहे. त्यामुळे या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश लोकांपर्यंत जाऊ शकतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

कोल्हापुरात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे संकेत दिले. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने राज्यातील युती सरकार आता अस्थिर बनले आहे. त्यामुळे या परिस्थिती शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाऊ शकतो. तसेच यावेळी राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नाही. हा निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर समविचारी पक्षांसोबत त्या लढवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आहे, असे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांनी म्हटले होते. यावर पवारांनी निरुपम यांची संभावना मूर्ख माणूस अशी आहे. त्यांचे सार्वजनिक जीवनात योगदान काय, असा सवालही त्यांनी केली.