|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल : मनोहर जोशी

राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल : मनोहर जोशी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंनी एकत्र यावे, अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.

डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱया युवा संसदेच्या उद्घाटनापूर्वी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज-उद्धव हे बंधू एकत्र येतील का, असा प्रश्न विचारला असता जोशी म्हणाले, राज-उद्धव यांनी एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, यासाठी दोघांची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल.