|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » युती तुटली म्हणून मुख्यमंत्री झालो : मुख्यमंत्री

युती तुटली म्हणून मुख्यमंत्री झालो : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील विधानसभा 2014 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने भाजपची ताकद लक्षात आली आणि मी मुख्यमंत्री झालो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

गोरेगाव येथे आयोजित भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थिती होते.