|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात : चव्हाण

राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात : चव्हाण 

एक -दोन दिवसात घोषणा करणार

मुंबई / प्रतिनिधी

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून बहुतांश ठिकाणची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत एक-दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाईल, असे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

टिळक भवन येथे शनिवारी राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन जातीयवादी पक्षाला फायदा होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. ठाणे महापालिकेत आघाडीची चर्चा जवळ जवळ पूर्ण झाली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. तर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी सन्मानपूर्वक तोडगा निघाल्यास आघाडी केली जाईल, असेही चव्हाण म्हणाले.

आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पफथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: