|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » परीक्षेचा कालावधी उत्सवाप्रमाणे साजरा करा : पंतप्रधान

परीक्षेचा कालावधी उत्सवाप्रमाणे साजरा करा : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

परीक्षेचा कालावधी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केल्यास विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनीच पुढाकार घेऊन पुढे यायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले.

‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देशवासीयांशी संवाद साधला. सध्या लवकरच दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षा येत आहे. या परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांविषयी मोदी यांनी सांगितले, गुण आणि गुणपत्रिका याचा उपयोग मर्यादित आहे, जीवनात तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य कामी येणार आहे. जीवनात स्वतःशी स्पर्धा करा, दुसऱयांशी स्पर्धा करणे टाळा, असे सांगत असताना सचिन तेंडुलकरचा दाखला दिला. सचिनने नेहमी स्वतःलाच आव्हान दिले, त्यातूनच तो विक्रमांचे नवनवीन शिखर गाठू लागला.