|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » केजरीवालांविरोधात एफआयआर दाखल करा ; निवडणूक आयोगाचे आदेश

केजरीवालांविरोधात एफआयआर दाखल करा ; निवडणूक आयोगाचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 8 जानेवारीला गोव्यातील भाषणात एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले.

काँग्रेस आणि भाजपकडून मतदारांनी पैसे घ्यावेत, पण मतदान आम आदमी पक्षाला करावे, असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला. तसेच समोरचा पक्ष तुमच्या मतासाठी पाच हजार रुपये देत असेल, तर त्यांच्याकडून दहा हजार रुपये मागा, असे केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत कायद्यातील अनुच्छेद 123(1), 171(बी), 171(ई) यांचा भंग झाल्याने केजरीवाल यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, याबरेबरच केजरीवाल यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारदेशीर कारवाईचा अहवाल 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Related posts: